संभाजीनगर येथे सामाजिक माध्यमांवर तेढ पसरवणाऱ्या ७०० पोस्ट ‘सायबर सेल’ने काढल्या !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याविषयी केलेल्या आवाहनानंतर सामाजिक माध्यमांवर दोन्ही बाजूंनी तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट तिपटीने वाढल्या आहेत.

संतांच्या प्रत्येक साहित्यात पर्यावरणाविषयी सखोल माहिती ! – प्रा. किरण वाघमारे, अकोला

ज्ञानेश्वरीच्या पानापानांत पर्यावरण आहे. समर्थ रामदासस्वामी यांनी ‘बाग’ या विषयावर दासबोधात वर्णन केले असून त्यात २८ समास पर्यावरणाला वाहिले आहेत. यात ३०० वृक्षांची माहिती आहे. त्यामुळे संतांच्या प्रत्येक साहित्यात पर्यावरणाविषयी सखोल माहिती आहे, असे मत अकोला येथील प्रा. किरण वाघमारे यांनी व्यक्त केले.

शेंदुर्णी (जिल्हा जळगाव) नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून केवळ भगवे झेंडे हटवतांना पदाधिकाऱ्यांनी रोखले !

केवळ भगवे ध्वज कसे काढले गेले ? कर्मचाऱ्यांना तसे सांगण्यात आले होते का ? याचा शोध घेतला पाहिजे. कर्मचारी सांगितल्यानुसार कारवाई करतात, असेच सहसा होते आणि तसे झाले नसेल, तर कर्मचाऱ्यांनी काय कारवाई केली, हे पहाणे मुख्याधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही का ?

‘मलबार गोल्ड’चा हिंदुद्वेष !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात राहून ही आस्थापने, संघटना, संस्था हिंदुविरोधी कारस्थाने रचत असतांना त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याची कृती सर्वाेत्तम आहे. हिंदूंचा सन्मान विज्ञापनकर्ता, अभिनेते, अभिनेत्री, चित्रपट अथवा मालिका निर्माते यांनी राखणे आवश्यकच आहे, अन्यथा वैध मार्गाने विरोध ठरलेलाच आहे, हे निश्चित !

भारनियमनामुळे बिडकीन येथील युवकांचा महावितरण कार्यालयात मुक्काम !

महावितरणकडून ग्रामीण भागात रात्री १२ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अचानक भारनियमन चालू केल्याने जनता त्रस्त झाली आहे.

कोरुतला येथे हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु राष्ट्रासाठी सामूहिक प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त तेलंगाणामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती’अभियानांतर्गत जगित्याल जिल्ह्यातील कोरुतला येथील श्री महादेव मंदिरामध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

हिंदूंवर पक्षपाती कारवाई !

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे भगवा झेंडा लावल्यानंतर धर्मांधांनी त्याला आक्षेप घेऊन शहरात दंगल घडवली.

संपूर्ण देशात असे करा !

देहलीतील ४० गावांची नावे इस्लामी आहेत. ती पालटण्यासाठी देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती देहलीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिली.

‘ॲम्वे इंडिया’ची ७५७ कोटी रुपयांची मालमत्ता होईपर्यंत ‘ईडी’ झोपली होती का ?

‘अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘ॲम्वे इंडिया’ या आस्थापनाच्या ७५७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर आर्थिक अपव्यवहार कायद्याच्या अंतर्गत टाच आणली आहे. ‘