क्रांतीकारकांच्या बलीदानाच्या पुण्यस्मरणाने अखंड भारताच्या निर्मितीसाठी तरुणांची मानसिकता घडेल ! – डॉ. अजय कुलकर्णी, महासचिव, स्वातंत्र्यवीर सावरकर समिती
क्रांतीकारकांच्या बलीदानाचे पुण्यस्मरण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने झाले पाहिजे. तसे झाले, तरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अखंड भारताचे जे स्वप्न होते, त्याच्या निर्मितीसाठी आजच्या तरुणांची मानसिकता घडेल.