भारनियमनामुळे बिडकीन येथील युवकांचा महावितरण कार्यालयात मुक्काम !

बिडकीन (जिल्हा संभाजीनगर) – महावितरणकडून ग्रामीण भागात रात्री १२ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अचानक भारनियमन चालू केल्याने जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बिडकीन गावातील काही तरुणांनी २१ एप्रिलच्या मध्यरात्री महावितरण कार्यालयात मुक्काम ठोकला. ‘भारनियमनाची वेळ न पालटल्यास या कार्यालयात महिलाही मुक्कामाला येतील आणि वीज मंडळाच्या विरोधात आंदोलन छेडतील’, अशी चेतावणी ग्रामस्थ राजेंद्र चव्हाण यांनी या वेळी दिली. ‘भारनियमनाची वेळ रात्री ठेवू नये; कारण लोकांचे स्वास्थ्य बिघडू शकते आणि चोरीच्या घटना वाढू शकतात. त्यामुळे भारनियमन दिवसभर ठेवावे’, असे ग्रामस्थांनी सांगितले.