स्वराज्य हे सुराज्य नसते !

‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७४ वर्षे अनुभवले आहे.’

प्रभु श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत भाविकांनी भावपूर्ण वातावरणात साजरी केली रामनवमी !

रामराज्याची म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी श्रीरामाने बळ प्रदान करावे, अशी भावपूर्ण प्रार्थना करून त्यासाठी प्रयत्नरत झालेले प्रभु श्रीरामांना अधिक आवडेल, हे लक्षात घ्या !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बागलकोट (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा पार पडली !

श्री. विजय रेवणकर यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात’ याविषयी, तर सर्वश्री व्यंकटरमण नायक आणि बसवंत गौडा दानप्पगौडा यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समाजात धर्मप्रसार कसा करायचा ?’, याविषयी मार्गदर्शन केले.

रामजन्मभूमी खटल्यातील मुख्य अधिवक्ता के. परासरन् यांचा सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आला सन्मान !

अधिवक्ता परासरन् यांना सनातनचे संत पू. प्रभाकरन् यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि तमिळ भाषेतील सनातननिर्मित ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्या हस्ते  के. परासरन् यांना सनातननिर्मित भगवान श्रीरामाचे चित्र भेट दिले.

मद्याची दुकाने आणि बार यांना देवतांची नावे देण्यास बंदी !

मद्याची दुकाने आणि बार यांना देण्यात येणारी हिंदूंच्या देवतांची नावे हटवण्यात यावीत, यासाठी हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रयत्नशील होती. यासाठी समितीने निवेदने देणे, जागृती करणे यांसारखे उपक्रम राबवले. या निर्णयामुळे समितीच्या या मोहिमेला यश मिळाले आहे, असेच म्हणावे लागेल.

भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणाऱ्या श्रीमती मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) सनातनच्या ११९ व्या समष्टी संतपदी विराजमान !

श्रीरामनवमीच्या मंगलमयदिनी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणाऱ्या मूळ वर्धा येथील; मात्र सध्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करणाऱ्या सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार या सनातनच्या ११९ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.

नागपूर येथील ९९ वर्षे पूर्ण केलेल्या पोद्दारेश्वर मंदिरात श्रीरामजन्मोत्सव साजरा !

विदर्भातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर श्रीराम मंदिरात या वर्षी राम जन्मोत्सवाचा उत्सव पुष्कळ उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. २ वर्षांनंतर भक्तांच्या उपस्थितीत ‘राम जन्मोत्सव’ साजरा होत आहे.

मुंबई उपनगरातील सोसायटींना बजावलेल्या अकृषिक कराच्या नोटिसींना स्थगिती !

मुंबई उपनगरातील रहिवाशांना बजावण्यात आलेल्या अकृषिक कराच्या नोटिसींना स्थगिती देणारा शासन निर्णय काढण्यात आला आहे. याविषयी भाजपच्या पाठपुराव्याला यश आले असून मुंबई उपनगरातील रहिवाशांना दिलासा मिळाला.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

मुंबईसह उपनगरांमध्ये विविध ठिकाणी देवतांना साकडे !

हिंदु महासंघाकडून मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या विरोधात निषेध आंदोलन !

येथील कात्रज तलावाच्या जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हिंदु महासंघाने मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या विरोधात १० एप्रिल या दिवशी आंदोलन केले.