सर्वधर्मसमभावामुळेच हिंदूंची होत आहे अपरिमित हानी ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती
आजगे (लांजा) येथील हिंदु जनजागृती समितीची हिंदु-राष्ट्र जागृती सभा
आजगे (लांजा) येथील हिंदु जनजागृती समितीची हिंदु-राष्ट्र जागृती सभा
या प्रकरणात सहभागी असलेले शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि अधिकारी यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हायला हवी, असेच जनतेला वाटते !
अनेक ठिकाणी शोभायात्रांमध्ये सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. मंदिरांमध्ये श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात आला. शेकडो ठिकाणी फलकलिखाण करून प्रवचने, तसेच ग्रंथप्रदर्शन यांचेही आयोजन करण्यात आले होते.
सरकारकडून विविध योजना चालू करण्यात येऊनही आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद करूनही कुपोषित बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असेल, तर हा निधी नक्की जातो कुठे ? या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना आजन्म कारावासाची शिक्षा द्यायला हवी !
राजस्थान येथील करौली येथे गुढीपाडवा अर्थात् हिंदु नववर्षदिनाला हिंदूंनी दुचाकींची फेरी काढली होती. ती फेरी धर्मांधांच्या भागात आल्यावर तिच्यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. तसेच तेथील हिंदूंच्या दुकानांवर दगडफेक करून त्यांची जाळपोळ करण्यात आली.
विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या विषयावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता का होत नाही ? परीक्षांची भीती का वाटते ? परीक्षेला सामोरे कसे जावे ? खरा आनंद कशामध्ये आहे ?’, या आणि यांसारख्या अनेक सूत्रांवर चर्चा केली.
गुरुग्राम (हरियाणा) येथे गोरक्षक आणि पोलीस यांनी २२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ट्रकमधून गोवंशियांची तस्करी करणाऱ्या ६ गोतस्करांना अटक केली.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केले त्याला आता ४५ दिवस होत आहेत. बघता बघता कथित मोठ्या आणि सामर्थ्यशाली अमेरिका अन् युरोप यांच्या अब्रूच्या चिंध्या करत रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानी बाहेर येऊन ठेपले आहे.
दोषी आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींचे हात आणि पाय यांचे ठसे, छायाचित्र, डोळ्यांचे पडदे, हस्ताक्षर, भौतिक आणि जैविक नमुने, तसेच त्यांच्या विश्लेषणाची माहिती गोळा करण्याचे अधिकार पोलिसांना मिळणार आहेत.
संसदेतील कोणत्याही कायद्याप्रमाणे नाही, तर मंदिरामध्ये स्थानापन्न असलेल्या देवतेच्या नियमाप्रमाणेच मंदिर चालले पाहिजे. हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिर चालले पाहिजे.