|
अयोध्येतील रामतत्त्वाचा लाभ केवळ व्यष्टी साधनेसाठी करून न घेता समष्टी साधनेसाठी करून घेण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करायला हवेत ! रामराज्याची म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी श्रीरामाने बळ प्रदान करावे, अशी भावपूर्ण प्रार्थना करून त्यासाठी प्रयत्नरत झालेले प्रभु श्रीरामांना अधिक आवडेल, हे लक्षात घ्या ! – संपादक
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मोत्सव देशभरात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोचले. सकाळपासूनच मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १२ वाजता अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी, कनक भवन, श्री रामवल्लभकुंज, लक्ष्मण किल्ला आणि दशरथ महाल यांच्यासह १० सहस्र मंदिरांमध्ये रामलल्लाची जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ही सर्व मंदिरे फुलांनी सजवण्यात आली होती.
Devotees throng Ayodhya’s Ram Temple on occasion of Ram Navami pic.twitter.com/Wma3IPxi2n
— Take One (@takeonedigital) April 10, 2022
अयोध्यानगरीला अनुमाने एक सहस्र क्विंटल (१ लाख किलो) फुलांनी सजवण्यात आले, तर अनुमाने ५०० क्विंटलचा (५० सहस्र किलोचा) प्रसाद चढवला गेला. अयोध्येत येणाऱ्या भाविकांनी शरयू नदीत स्नान केले. त्यानंतर हनुमानगढी, श्रीरामजन्मभूमी, कनक भवन, श्री रामवल्लभकुंज, लक्ष्मण किल्ला, दशरथ महाल आदी मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले.