हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
विजयपूर (कर्नाटक) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयपूरमधील माहेश्वरी मंगल कार्यालयात हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा पार पडली. त्याला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी समितीचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे उत्तर कर्नाटक समन्वयक श्री. विजय रेवणकर यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात’ याविषयी, तर सर्वश्री व्यंकटरमण नायक आणि बसवंत गौडा दानप्पगौडा यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समाजात धर्मप्रसार कसा करायचा ?’, याविषयी मार्गदर्शन केले. सनातन संस्थेचे ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले धर्मप्रचारक श्री. काशिनाथ प्रभु यांनी ‘समष्टी कार्यात साधनेचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या धर्मप्रेमींचे अभिप्राय
१. सौ. जयश्री शांतप्पनवर, बदामी – सनातनचा आश्रम आणि तेथील व्यवस्था यांविषयी साधक सांगत होते; परंतु या २ दिवसांच्या शिबिरात ‘मी आश्रमात आहे’, अशी अनुभूती आली.
२. सौ. ऋतुजा गायधनकर, कलबुर्गी – प्रायोगिकरित्या ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप करतांना साक्षात् श्रीकृष्णाचे दर्शन झाले.
३. श्री. मंजुनाथ जुम्मण्णवर, बदामी – पूर्वजन्माचे पुण्य आणि गुरुकृपेने मला कार्यशाळेत ज्ञानामृत मिळाले. मी परात्पर गुरुदेवांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान कार्यात सहभागी होईन.