बांगलादेशातील वैद्यकीय महाविद्यालयात सर्व धर्माच्या विद्यार्थिनींसाठी हिजाब अनिवार्य !

कर्नाटकमधील हिजाबविरोधी आंदोलनांवरून भारतात अल्पसंख्यांचे धार्मिक अधिकार चिरडले जात असल्याची ओरड करणारे इस्लामी देश बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या चिरडल्या जाणार्‍या धार्मिक अधिकारांविषयी चकार शब्दही काढत नाहीत !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करा ! – युक्रेनच्या राजदूतांचे शिवभक्तांना आवाहन

‘युक्रेनमधील स्थिती सुधारावी, तेथील युद्ध समाप्त व्हावे’, असेच सहिष्णु भारतियांना वाटते. भारतातील शिवभक्तांना असे आवाहन करतांना युक्रेनच्या राजदूतांनी ‘युक्रेन नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका का घेतो ?’, याचेही उत्तर द्यावे !

हरियाणामधील सोनिपत येथील खलिस्तानी आतंकवाद्यांच्या ३ हस्तकांना अटक

खलिस्तानी आतंकवाद समूळ नष्ट केला नाही, तर त्याचे पुढे परिणाम पूर्ण भारताला भोगावे लागतील. यासाठी सरकार पावले कधी उचलणार ?

हिंदु कुटुंबाला प्रलोभन दाखवून धर्मांतर केल्याच्या आरोपावरून ३ ख्रिस्त्यांना अटक

ख्रिस्ती धर्मप्रचारकांना कशाचेच भय न राहिल्यामुळे ते आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्यास धजावतात. अशांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !

कराड येथील कृष्णामाई घाटावर पू. विठ्ठलस्वामी यांना आढळून आली १८ व्या शतकातील गजलक्ष्मीची मूर्ती !

वडगाव येथील जयरामस्वामी मठाचे मठपती पू. विठ्ठलस्वामी वडगावर हे कराड येथील प्राचीन विष्णु-लक्ष्मी मंदिरामध्ये मूर्ती स्थापनेसाठी आले होते. कृष्णामाई घाटावर त्यांना एक पुरातन गजलक्ष्मीची मूर्ती आढळून आली.

देशातील मंदिरे आणि पराक्रम यांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवण्यात आला ! –  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागरिकांनी प्रेरणा घेऊ नये, यासाठी देशातील मंदिरे आणि पराक्रम यांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातही तीच परंपरा चालू राहिली.

बेंगळुरू दंगलीच्या प्रकरणात धर्मांधाला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

‘अनेक पुराव्यांची पडताळणी केली असता दंगलीच्या वेळी कलीम तेथे उपस्थित होता आणि त्याने सरकारी आणि वैयक्तिक मालकीच्या संपत्तीची हानी केली. त्या वेळी पोलिसांवरही आक्रमण करून लोकांच्या मनात भय निर्माण केले.’

खारकीवमध्ये रशियाच्या आक्रमणात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

भारताने युक्रेन आणि रशिया यांच्या भारतातील राजदूतांना विचारला जाब

साहिबगंज (झारखंड) येथील मुसलमानबहुल गावातील श्री दुर्गादेवी मंदिरात अज्ञातांनी फेकले गोमांस !

झारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने आरोपींवर कारवाई होण्याची शक्यता अल्पच म्हणावी लागेल !

‘युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्च’कडून रशियाच्या आक्रमणाला विरोध !

युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चने वर्ष २०१९ मध्ये रशियन ऑर्थोडॉक्स चर्चपासून विभक्त होऊन स्वतःला मुक्त केले होते. आता युक्रेनच्या चर्चला अमेरिकेसह इतर पाश्‍चात्त्य देशांकडून आर्थिक आणि इतर साहाय्य मिळते. हे रशियाला मान्य नाही.