खारकीवमध्ये रशियाच्या आक्रमणात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

  • भारताने युक्रेन आणि रशिया यांच्या भारतातील राजदूतांना विचारला जाब

  • भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची भारताची युक्रेनकडे मागणी

भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा (उजवीकडे)

खारकीव (युक्रेन) – येथे भारताच्या नवीन शेखरप्पा या २१ वर्षीय विद्यार्थ्याचा रशियाच्या हवाई आक्रमणात मृत्यू झाला, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुबाच्या संपर्कात आहे. नवीन हा कर्नाटकातील चलागेरी येथील रहिसावी आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याने ‘व्हिडिओ कॉल’द्वारे कुटंबियांशी संपर्क साधला होता. खारकीव येथील छावणीमध्ये तो रहात होता. खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी तो बाहेर पडला असतांना झालेल्या आक्रमणात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारतातील परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील युक्रेन आणि रशिया यांच्या राजदूतांकडे याविषयी जाब विचारला आहे, तसेच भारतीय विद्यार्थ्यांना युद्धग्रस्त शहरांमधून बाहेर काढण्यासाठी तातडीने सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी युक्रेनकडे केली आहे.