आरोपीवर कारवाई न झाल्यास विहिंपकडून आंदोलन करण्याची चेतावणी
झारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने आरोपींवर कारवाई होण्याची शक्यता अल्पच म्हणावी लागेल ! – संपादक
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
साहिबगंज (झारखंड) – येथील फुलबड़िया गावातील कालीबाडी दुर्गादेवी मंदिरात अज्ञातांकडून गोमांस फेकल्याची घटना समोर आली आहे. यावर विश्व हिंदु परिषदेने पोलिसांत तक्रार करत ‘आरोपीला तात्काळ अटक केली नाही, तर आम्ही आंदोलन करू’, अशी चेतावणी दिली आहे.
विहिंपचे पदाधिकारी कालीचरण मंडल यांनी सांगितले की, येथे हिंदू अल्पसंख्य, तर मुसलमान बहुसंख्य आहेत. सकाळी एक महिला येथे फुले तोडण्यास आली असता तिला मंदिरात गोमांस आढळून आल्यावर तिने आरडाओरड चालू केला. तेव्हा अरशद अली याने गोमांसाचा तुकडा बाहेर फेकून दिला. ते गोमांस होते कि अन्य कोणते मांस होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गावकर्यांनी ‘अरशद अली याने मंदिरातून गोमांस बाहेर का फेकले ? तो पुरावा नष्ट करू पहात होता का ?’, आदी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Jharkhand: Objectionable thing suspected to be meat thrown inside Kalibari Durga temple in Sahibganj, case to be registeredhttps://t.co/W7d7asRO0G
— OpIndia.com (@OpIndia_com) February 28, 2022