खलिस्तानी आतंकवाद समूळ नष्ट केला नाही, तर त्याचे पुढे परिणाम पूर्ण भारताला भोगावे लागतील. यासाठी सरकार पावले कधी उचलणार ? – संपादक

सोनिपत – पोलिसांनी खलिस्तानी आतंकवाद्यांसाठी काम करणार्या ३ हस्तकांना अटक केली. सागर, सुनील आणि जतिन अशी त्यांची नावे आहेत. शहरात हत्या घडवून समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा या तिघांचा कट होता. हे तिघे जण कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया येथे कार्यरत असलेल्या ‘खलिस्तान टायगर फोर्स’ आणि ‘इटरनॅशनल सिख युथ फेडरेशन’ या आतंकवादी संघटनांसाठी काम करत होते. हे तिघेही सुपारी घेऊन हत्या करणारे आहेत. हे तिघे हस्तक सामाजिक माध्यमांद्वारे आतंकवाद्यांच्या संपर्कात होते. याआधी या तिघांनी उधमपूर गावातील माजी सरपंच अवतार सिंह यांची हत्या केली होती. या तिघांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
3 contract killers for West-based Khalistani terror orgs arrested in Sonipat, Haryana https://t.co/DsMNNE8QoW
— HinduPost (@hindupost) February 28, 2022
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !