कोरोनामुळे शिवनेरीवरील ‘शिवजन्मोत्सव’ साध्या पद्धतीने साजरा होणार !

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचा शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मोत्सव हा कोरोनाच्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येईल.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक माध्यमांद्वारे मोहीम !

नाईकवाडे यांनी देवस्थान समितीमधील काही अनियमित गोष्टींवर चाप लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे स्थानांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण ! – छत्रपती संभाजीराजे भोसले

मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली; मात्र अजून कोणतीच मागणी पूर्ण नाही. सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहे.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची दैनावस्था !

‘डोळे उघडले की, दिसते. तसे साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील दिसते आणि कळते. साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत न केल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

संस्कृती रक्षणाच्या कार्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ! – गुरुराज प्रभु, सनातन संस्था

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने रुद्रप्रयाग विद्या मंदिरातील शिक्षकांना करण्यात आले मार्गदर्शन !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

हिंदु युवती धर्मापासून दूर गेल्यामुळेच धर्मांधांना त्यांना फसवणे शक्य होते. हे लक्षात घेऊन त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान वाढवणे आवश्यक आहे !

कुराणमध्ये सांगितलेली सर्व बंधने अनिवार्य प्रथेच्या अंतर्गत येतात का ? – उच्च न्यायालयाचा प्रश्न

राज्यघटनेतील कलमानुसार राज्य सरकार कोणतीही धार्मिक, आर्थिक आणि राजकीय कृती थांबवू शकते. जर आरोग्य आणि नैतिकता यांच्याशी संबंधित असेल, तर धर्माशी संबंधित मूळ प्रथेवरही नियंत्रण आणण्यात येऊ शकते.

जमावबंदीचा आदेश झुगारून हिजाबच्या समर्थनार्थ मोर्चे !

गृहराज्यमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ‘अन्य राज्यातील हिजाबचे सूत्र आपल्या राज्यात नको’, असे सांगितले असतांनाही हे मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे गृहमंत्रालय या मोर्चेकर्‍यांवर काय कारवाई करणार आहे ?

नागपूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात ‘टेडी बेअर’ जाळून बजरंग दलाचे आंदोलन !

जळगाव आणि भोपाळ (मध्यप्रदेश) येथेही ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात आंदोलन !