झारखंडमध्ये धर्मांधाने केले हिंदु युवतीचे लैंगिक शोषण !
|
रांची (झारखंड) – गुमला येथे असलम मिया याने ‘सोनू साहू’ बनून हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने त्या युवतीला लग्नाचे आमीष देत अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने पीडितेला धमकी दिली आणि लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडितेने सिसई पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
१. पीडितेने तक्रारीमध्ये म्हटले आहे की, डिसेंबर २०२० मध्ये तिच्या गावामध्ये जत्रा भरली होती. त्या वेळी त्या दोघांचा परिचय झाला आणि त्यांनी एकमेकांचा भ्रमणभाष क्रमांक घेतला. परिचय वाढल्यानंतर आरोपीने पीडितेला लग्न करण्याचे आश्वासन दिले.
२. एक दिवस आरोपीने पीडितेला त्याच्या भडगाव येथील घरी नेले. तेथे त्याने सतत ३ दिवस पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्या वेळी पीडितेला ती ज्याला ‘सोनू साहू’ समजत होती, तो वास्तविक असलम मिया असल्याचे समजले. तरीही पीडितेने आरोपीकडे लग्न करण्याची मागणी केली.
चेन्नई येथे ‘ब्युटी पार्लर’मध्ये काम देण्याच्या निमित्ताने अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार
धर्मांध महिलेसह ३ आरोपींच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट
महिला प्रतिदिन धर्मांधांच्या अत्याचाराला बळी पडत असतांना महिला हक्क आयोग काय करत आहे ?
चेन्नई – चेन्नई पोलिसांनी देहव्यापारामध्ये ढकलण्यात आलेल्या त्रिपुराच्या ४ अल्पवयीन मुलींना वाचवले. ‘ब्युटी पार्लर’मध्ये (सौंदर्य वर्धनालयात) काम देण्याच्या निमित्ताने चेलमा खातून ही धर्मांध महिला या मुलींकडून देहव्यापार करून घेत होती. या सर्व मुलींचे वय १४ ते १७ वर्षे आहे. या मुलींसमवेत बलात्कार आणि शारीरिक अत्याचार यांसारखे अपप्रकार करण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी चलेमा खातून हिच्यासमवेत मोईनुद्दीन, अन्वर हुसैन आणि अलाउद्दीन यांनाही आरोपी करण्यात आले आहे. हे सर्व आरोपी पसार झाले असून त्या सर्वांच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्यासह अन्य कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
१. सर्व ४ मुलींना १७ जानेवारी या दिवशी त्रिपुरा येथून चेन्नई येथे आणण्यात आले होते. त्यापूर्वी त्यांच्या नातेवाइकांना १३ सहस्र रुपये देण्यात आले होते. चेन्नईमध्ये या सर्वांना केलमबक्कम् येथील भाड्याच्या २ खोल्यांमध्ये ठेवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेण्यात येत होता. या मुलींना प्रतिदिन न्यूनतम ६ ग्राहकांकडे पाठवण्यात येत होते. शोषणाचा हा प्रकार सायंकाळी ७ वाजता चालू होऊन दुसर्या दिवशी सकाळपर्यंत चालू रहायचा.
२. याखेरीज प्रत्येक मुलीला प्रतिदिन ५० सहस्र रुपये कमवण्याचे बलपूर्वक ध्येय देण्यात आले होते. या मुलींच्या अश्लील चित्रफितीही बनवण्यात आल्या होत्या आणि त्याद्वारे त्यांना धमकावण्यात येत होते. या मुलींना दळणवळण बंदी असतांनाही विविध ठिकाणी पाठवण्यात आले होते.