माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

नवी मुंबई येथील माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली.

शिवजयंती साजरी करण्यासाठी शासनाची नियमावली घोषित !

१९ फेब्रुवारीला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी शिवज्योत आणि जन्मोत्सव कार्यक्रम यांसाठी विशेष गोष्ट म्हणून अनुमती देण्याची मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती.

गोव्यात ७८.९४ टक्के मतदान !

राज्यात काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततापूर्ण मतदान झाले. ४० मतदारसंघांमधील ३०१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत ‘सीलबंद’ झाले आहे. निवडणुकीचा निकाल १० मार्च या दिवशी आहे.

महाराष्ट्रात हिजाबला समर्थन असल्याचे दाखवण्यासाठी दैनिक ‘लोकसत्ता’कडून कर्नाटकमधील छायाचित्र वापरून दिशाभूल !

चुकीची माहिती देणारी पत्रकारिता समाजहित काय साधणार ? हा हिंदुविरोधी अजेंडा राबवण्याचा प्रकार आहे का ? याची चौकशी व्हायला हवी !

गुन्हेगार (?) पोलीस !

पोलीस विभागाने गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न होणे नगण्यच आहे.

उरळी कांचन (जिल्हा पुणे) येथे ‘शिववंदना’ उपक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची करून देण्यात आली ओळख !

आयोजकांनी समितीच्या वतीने सिद्ध करण्यात येणार्‍या गुढीपाडव्याच्या १५० शुभेच्छापत्रांची मागणी केली असून गावामध्ये त्याच्या वितरणाचे नियोजन केले आहे.

नागपूर येथे शाळा बंद असतांना बालविवाहाचे प्रमाण वाढले, ११ प्रकरणे उघडकीस !

कोरोना संसर्गाच्या काळात शाळा बंद असल्याने पालक स्वतःच्या पाल्याला वैतागले होते. त्यामुळे पालकांनी बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असतांनाही घरात बसलेल्या मुलींचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला.

नगर येथे जप्त केलेल्या टँकरमधील ‘डिझेल’ चोरतांना पोलिसालाच रंगेहात पकडले !

येथील पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या बनावट डिझेल चोरीच्या २ टँकरमधील बायोडिझेल चोरी करतांना एका पोलीस कर्मचार्‍यासह चौघांविरुद्ध कट करून बायोडिझेल चोरीचा, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे

हडपसर (पुणे) येथे शासकीय स्वस्त धान्याचा ८०० क्विंटल तांदुळाचा साठा शासनाधीन !

काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा शासकीय स्वस्त धान्याचा ८०० क्विंटल तांदुळाचा साठा गुन्हे शाखेच्या पथकाने शासनाधीन केला. अन्वेषणामध्ये या तांदूळ वाहतुकीसाठी जी.एस्.टी.च्या बनावट पावत्या केल्याचे आढळून आले.