नांदेड येथे भूमी विकून शिवसैनिकाने बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभे केले !

शिवसैनिक संजय इटग्याळकर यांनी १ एकर परिसरात हे मंदिर उभे केले आहे. याठिकाणी विनामूल्य कराटे प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा आणि सांस्कृतिक सभागृह उभारून या परिसरातील तरुणांना त्याचा लाभ मिळावा हा त्यांचा मानस आहे.

खासदार नवनीत राणा यांच्या ‘ऑडिओ क्लिप’विषयी महिला आयोगाने मागितला खुलासा !

या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी योग्य तो खुलासा लेखी स्वरूपात द्यावा, असे निर्देश महिला आयोगाने त्यांना दिले आहेत.

महाराष्ट्रात ११ मासांत २ सहस्र ४९८ शेतकर्‍यांची आत्महत्या !

कृषीप्रधान महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी विविध योजना चालू करूनही सहस्रो शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लज्जास्पद आहे.

गोवा शासनाने कोरोनाविषयक निर्बंधांचा कालावधी १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवला

शाळा, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण देणार्‍या संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद रहाणार आहेत; मात्र शिक्षक ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यासाठी शाळांमध्ये उपस्थित रहाणार !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाव आणि धरणे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येणार !

प्रतिवर्षी पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असतो. यातील काही निधी यापुढे जिल्ह्यात असलेली धरणे आणि तलाव यांच्या सुशोभिकरणावर खर्च व्हावा. त्यामुळे पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यास विलंब लागण्याची शक्यता

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून करण्यात आलेल्या पहाणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे आता पुन्हा पहाणी करण्यात येईल अन् त्या वेळी त्रुटी निघाल्यास त्यांची पूर्तता प्रशासनाकडून करण्यात येईल.

राजकीय नेते पक्षाचा, तर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती धर्माचा प्रसार करतात !

‘निवडणुकीत आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी विविध नेते सर्वत्र फिरतात; पण सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती धर्मप्रसार करतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पंजाबला भारतापासून तोडण्यासाठी खलिस्तानवाद्यांना समवेत घेऊन शत्रूचे छुपे युद्ध चालू ! – प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र

पंजाबमधील देशविरोधी तत्वांनी खलिस्तानवाद्यांसह देश-विरोधात सुरु केलेल्या ‘प्रॉक्सी वॉर’मध्ये ते कधी यशस्वी होणार नाहीत; कारण पंजाबमधील जनता भारतासमवेत आहे.

पुणे येथील मूर्तिकार लोहगावकर यांनी साकारला जम्मू-काश्मीरच्या खोर्‍यामधील नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा !

ही प्रतिकृती १४ सहस्र ८०० फूट उंचावर उभारण्यात आली असून जगात प्रथमच महाराजांची प्रतिकृती इतक्या उंचावर बसवण्यात आली आहे.

धर्मांधांकडून शिवमंदिर कह्यात घेऊन तेथे थडगे बांधण्यात येत असल्याचा हिंदुत्वनिष्ठांचा आरोप

महाराष्ट्रातील गड-किल्ले, देहलीच्या मोकळ्या जागा आणि आता राजस्थानमधील मंदिरे या सर्व ठिकाणी धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होणे, ही धोक्याची घंटा असून याविरोधात केंद्र सरकारने वेळीच संबंधितांवर कारवाई केली पाहिजे !