धर्मांधांकडून शिवमंदिर कह्यात घेऊन तेथे थडगे बांधण्यात येत असल्याचा हिंदुत्वनिष्ठांचा आरोप

बडी चौपड, जयपूर येथे शिवमंदिराला टाळे ! 

महाराष्ट्रातील गड-किल्ले, देहलीच्या मोकळ्या जागा आणि आता राजस्थानमधील मंदिरे या सर्व ठिकाणी धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होणे, ही धोक्याची घंटा असून याविरोधात केंद्र सरकारने वेळीच संबंधितांवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक 

जयपूर – बडी चौपड येथे शिवमंदिराला टाळे लावण्यात आले आहे. या ठिकाणी धर्मांधांकडून थडगे बांधण्यात येत असल्याचा आरोप येथील हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. यासंदर्भात ट्विटरवर एक चित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे.

यात म्हटले आहे, ‘येथील आमदार रसिक खान आणि अन्य लोक सातत्याने मंदिर बंद करण्यासाठी दबाव आणत आहेत. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील काँग्रेस सरकारने धर्मादाय विभागाच्या सांगण्यावरून या मंदिराला टाळे लावले आहे. हे हिंदु समाज सहन करणार नाही.’ हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी ३१ जानेवारी या दिवशी सर्व शिवभक्तांनी या मंदिरात येऊन तेथे अभिषेक करावा आणि हे मंदिर नेहमीसाठी भक्तांना खुले करण्याची मागणी करावी, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आले आहे.