
नांदेड – जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील इटग्याळ गावात शिवसैनिक संजय इटग्याळकर यांनी वडिलोपार्जित २ एकर भूमीची विकून आणि १४ लाख रुपये व्यय करून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभे केले आहे.
(सौजन्य : Sakal (सकाळ))
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून येणार्या संजय इटग्याळकर यांना बालपणापासूनच बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वासाठीच्या लढ्याचे आकर्षण होते. बाळासाहेबांची हिंदुत्वाविषयीची जागरूकता ही तरुण पिढीपर्यंत पोचावी, यासाठी वर्ष २०१३ मध्ये त्यांनी बाळासाहेबांचा पुतळा उभा केला आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत एक ज्योत तेथे नेहमी तेवत असते. तिथेच आता त्यांनी हे मंदिर उभारले आहे. इटग्याळकर हे उदरनिर्वाहासाठी देगलूर, मुखेड आणि उदगीर याठिकाणी तरुणांना कराटे प्रशिक्षण देतात; पण कोरोना आणि दळणवळण बंदीमुळे हे प्रशिक्षण बंद झाले आणि आर्थिक आवक बंद पडली. त्यासाठी त्यांनी वडिलोपार्जित २ एकर भूमीची विक्री करून जवळपास १ एकर परिसरात विस्तीर्ण अशा जागेत हे मंदिर उभा केले आहे. याठिकाणी विनामूल्य कराटे प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा आणि सांस्कृतिक सभागृह उभारून या परिसरातील तरुणांना त्याचा लाभ मिळावा हा त्यांचा मानस आहे.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !