हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘पंजाबला भारतापासून तोडण्याचे षड्यंत्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – पंजाबमधील एका न्यायालयात एका माजी पोलीस कर्मचार्याद्वारे बाँबस्फोट घडवला जातो, सीमावर्ती क्षेत्रात आर्.डी.एक्स्.ने भरलेली बस सापडते, पाकमधून ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ पंजाबमध्ये पाठवले जात आहेत, हे सर्व पहाता पंजाबमध्ये काही देशविरोधी तत्त्वे कार्यरत आहेत. त्यांनी खलिस्तानवाद्यांना समवेत घेतले आहे. देशाच्या विरोधात छुपे युद्ध (‘प्रॉक्सी वॉर’) प्रारंभ केले आहे; मात्र ते या युद्धात कधी यशस्वी होणार नाहीत; कारण पंजाबमधील जनता भारतासमवेत आहे. पंजाब सरकारने जागृत होऊन राज्य आणि सीमावर्ती भाग सुरक्षित ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने १५ जानेवारी २०२२ या दिवशी आयोजित केलेल्या ‘पंजाबला भारतापासून तोडण्याचे षड्यंत्र !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

या विशेष संवादामध्ये ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, अमेरिका येथील मां राज्यलक्ष्मी आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ४ सहस्र जणांनी प्रत्यक्ष पाहिले.
शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून देश अस्थिर करण्याचा खलिस्तानवाद्यांचा मोठा डाव ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय आणि प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टीस

खलिस्तानी चळवळीने चीन, पाकिस्तान आणि इस्लामी आतंकवादी यांच्याशी हात मिळवला असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती आहे. भारताच्या इतिहासात शिखांचे मोठे योगदान आहे; मात्र शेतकरी आंदोलनात शिखांना उतरवून सरकारने त्यांच्यावर गोळीबार करावा, असे वातावरण अनेकदा खलिस्तानवाद्यांनी निर्माण केले; मात्र सरकारने बळाचा वापर केला नाही. जर तसे झाले असते, तर त्या माध्यमातून देश अस्थिर करण्याचा मोठा डाव होता. पंतप्रधानांची गाडी अडवण्यामागेही मोठे षड्यंत्र आखले गेले होते.
भारतातील हिंदूंना धर्मांतरित करून देशाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे, हे एक वैश्विक षड्यंत्र ! – मां राज्यलक्ष्मी, अमेरिका

‘भारतातील हिंदूंना धर्मांतरित करा आणि नंतर भारताला नियंत्रित करून त्याला तोडा’, यासाठी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून षड्यंत्रे चालू आहेत. मिशनरी, पाकिस्तान, चीन, आंतरराष्ट्रीय समूह आदी कार्यरत आहेत. त्यात खलिस्तानी चळवळ, इस्लामी आतंकवाद, ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषद (डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व म्हणजे हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन), ‘सीएए’विरोधी (नागरिकत्व सुधारणा कायदाविरोधी) आंदोलने, शेतकरी आंदोलने, हिंदूंच्या देवतांचा अवमान करणे आदी अनेक कृत्ये जाणीवपूर्वक केली जात आहेत. हे एक वैश्विक षड्यंत्र आहे.
हे पहा –
|
काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

वर्ष १९८४ प्रमाणे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. शीख पंथ हा जातीयवादी वा देशद्रोही नाही; मात्र काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला. पंजाबचे मुख्यमंत्री चेन्नी हे दलित शीख असल्याचा प्रचार करून काँग्रेसने साक्षात् गुरु गोविंदसिंह यांचा अपमान केला आहे. शीख आणि त्यांच्या गुरूंचा छळ करणार्या औरंगजेबाच्या नावाने वर्ष २०१४ पर्यंत देहलीत एक महामार्ग होता. काँग्रेसने ते नाव कधी पालटले नाही. यातूनही काँग्रेसने एक प्रकारे शिखांचा अपमानच केला आहे.

B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष