पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे चंद्रभागा माता मंदिराचा जिर्णोद्धार संकल्प सोहळा उत्साहात ! 

वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, आर्ट ऑफ लिव्हिंग, तसेच महा.एन्.जी.ओ. फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चंद्रभागा माता मंदिराचा जिर्णोद्धार आणि परिसराचा विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मराठी भाषिकांवरील राजद्रोहाचे खटले मागे घ्यावेत या मागणीसाठी २२ जानेवारीला आंदोलन ! – शिवसेना

‘‘कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा अवमान झाल्यावर याचा निषेध नोंदवण्यासाठी बेळगावमध्ये आंदोलन करणार्‍या ६१ मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने राजद्रोहाचे गुन्हे नोंद केले आहेत. तरी हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.

देहू (जिल्हा पुणे) नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता !

पुण्यातील देहू नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. भंडारा उधळून, फटाके फोडून, ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

‘दया आवेदना’साठी घटना दुरुस्तीची आवश्यकता ! – उज्ज्वल निकम, अधिवक्ता

फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर करण्यात येणार्‍या दयेच्या आवेदनावर सुनावणीसाठी कालावधी निश्चित करणारी घटना दुरुस्ती करावी.

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन !

मागील ५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द व्यतीत करणारे ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे २१ जानेवारीच्या पहाटे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.

कर्जत तालुक्यातील धार्मिक स्थळाची विटंबना !

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते. घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ग्रामस्थ येथील महात्मा फुले चौकात एकत्र आले आणि त्यांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.

६ मासांपासून रिक्त असलेल्या जागेवर चिकित्सकाची (फिजिशियनची) नियुक्ती !

जिल्हा शासकीय रुग्णालयात पूर्णवेळ आधुनिक वैद्य असणे आवश्यक होते. हृदयरोग असणार्‍यांचीही संख्या रुग्णालयात अधिक आहे. यावरही आता तातडीने उपचार होणार आहेत.

गुळुंब (जिल्हा सातारा) येथे चित्रीकरण स्थळी दमदाटी करणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

सातारा पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन चित्रीकरण स्थळावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तरीही २० जानेवारी या दिवशी दुपारी संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांनी चित्रीकरण करणारे व्यवस्थापक आणि कलाकार यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘तत्त्वशून्य राजकीय पक्ष जनतेला खूश करून निवडून येण्यासाठी काहीही करतात, तर साधक केवळ ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कठोर प्रयत्न करायला सिद्ध असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले