देहू – पुण्यातील देहू नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. भंडारा उधळून, फटाके फोडून, ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांचा विजय झाला आहे, तर भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे हे पराभूत झाले आहेत. देहू नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी १३ जागांसाठी १८ जानेवारी या दिवशी मतदान पार पडले. ‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पार पडलेल्या या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी पक्षावर विश्वास ठेवला आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली, तसेच ‘संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तीर्थक्षेत्राचा विकास करू’, अशी ग्वाही शेळके यांनी दिली.