कर्जत तालुक्यातील धार्मिक स्थळाची विटंबना !

विटंबना करणारा युवक पोलिसांच्या कह्यात !

नगर – कर्जत तालुक्यातील राशीन (जिल्हा नगर) येथील एका धार्मिक स्थळाची विटंबना करण्याचा प्रकार १९ जानेवारी या दिवशी सायंकाळी घडला. ३३ वर्षीय तरुणाने केलेल्या या प्रकारानंतर उपस्थित भाविक आणि पुजारी यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते. घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ग्रामस्थ येथील महात्मा फुले चौकात एकत्र आले आणि त्यांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.