द्वारका बेटावरील २ द्वीपांवर मालकी सांगणारी सुन्नी वक्फ बोर्डाची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली !

जे सत्य नाही, इतिहासही तसा नाही, तरीही सुन्नी वक्फ बोर्ड अशा प्रकारचा दावा करत थेट न्यायालयात जाण्याचे धाडस करते, हे हिंदू कधी लक्षात घेणार ? हिंदु कधी मक्केवर दावा करण्याचे धाडस स्वप्नात तरी करू धजावतील का ?

(म्हणे) ‘कुणीही तलवारीच्या जोरावर कुणाचे धर्मांतर करत नाही, तर चांगल्या कामांकडे पाहून लोक धर्मांतर करतात !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे विधान

ख्रिस्ती आणि इस्लाम पंथियांकडून अशी कोणती चांगली कामे केली जात आहेत, हे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले पाहिजे !

महंमद पैगंबर यांचा अवमान करणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही ! – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन

धर्मांधांकडून हिंदूंसह, शीख, ख्रिस्ती आदी धर्मियांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना यांच्यावर घाला घातला जात आहे. याचाही जगभरातून प्रखर विरोध झाला पाहिजे !

निवडणूक जवळ आल्यामुळेच सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप ! – अशोक मोने, विरोधी पक्षनेते, सातारा नगरपालिका

‘‘प्रशासकीय मान्यता नाही आणि निधीही उपलब्ध नाही, असे असूनही नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजनाचा घाट का घातला ? हे सूज्ञ सातारावासिय ओळखून आहेत.

आगरा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘सांता क्लॉज’चा पुतळा जाळला !

आगरा येथील सेंट जॉन्स महाविद्यालयाच्या बाहेर आणि शहरातील विविध शाळांच्या बाहेर राष्ट्रीय बजरंग दल अन् आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘सांता क्लॉज’चे पुतळे जाळले. ‘सांता क्लॉज’ याला ‘फादर ख्रिसमस’ किंवा ‘सेंट निकोलस’, असेही म्हटले जाते.

पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी पालटायला हवी !

ज्या वेळी महिला अत्याचाराची घटना घडते, त्या वेळी संबंधित महिलेला मिळणारी वागणूक अयोग्य असते. तिला पोलीस ठाण्यामध्ये मिळणारी वागणूक पालटायला हवी. पीडित महिलेला अपराधी असल्याची वागणूक मिळणे चुकीचे आहे.

‘कोव्हॅक्सिन’ या स्वदेशी लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

यावरून जागतिक स्तरावर भारतीय आस्थापनांचे पाय ओढण्याचे कसे प्रयत्न केले जातात, हे यातून दिसून येते !

येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण चालू होणार ! – पंतप्रधान मोदी यांची घोषणा

कोरोना महामारीत लहान मुलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्या दिशेने आम्ही मोठे पाऊल टाकत आहोत. नवीन वर्षात पहिल्या सोमवारी अर्थात् ३ जानेवारीपासून आम्ही १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण चालू करत आहोत.

‘मुस्लिम पर्सनल लॉ’मुळे पौगंडावस्थेतील मुसलमान मुलगी स्वेच्छेने विवाह करू शकते ! – उच्च न्यायालय

मुसलमान मुलीने पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मुळे ती स्वत:च्या इच्छेनुसार कुणाशीही विवाह करून शकते. यामध्ये तिचे आई-वडील किंवा नातेवाईक हस्तक्षेप करू शकत नाहीत, असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे.

सिलचर (आसाम) येथे नाताळच्या कार्यक्रमात हिंदु तरुण-तरुणी यांनी सहभागी होण्यास काही लोकांचा विरोध

आसाममधील सिलचर येथे २५ डिसेंबरच्या रात्री नाताळ साजरा करत असतांना काही जणांनी त्याला विरोध केला. त्यांनी हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली. या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.