‘कोव्हॅक्सिन’ या स्वदेशी लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

यावरून जागतिक स्तरावर भारतीय आस्थापनांचे पाय ओढण्याचे कसे प्रयत्न केले जातात, हे यातून दिसून येते ! – संपादक

उजवीकडे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

भाग्यनगर (तेलंगाणा) – ‘भारत बायोटेक’ आस्थापनाच्या भारतीय ‘कोव्हॅक्सिन’ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला जागतिक आरोग्य संघटनेने नोव्हेंबर मासामध्ये संमती दिली; मात्र त्यापूर्वी या स्वदेशी लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले होते. ‘फायझर’सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी भारतातील काही लोकांशी हातमिळवणी करून ‘कोव्हॅक्सिन’ला अपकीर्त करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडेही तक्रार केली होती, असे विधान सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी येथे केले. ‘रामिनेनी फाऊंडेशन’च्या पुरस्कार सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते.

१. सरन्यायाधीश रमणा पुढे म्हणाले की, भारत बायोटेकचे कृष्णा एला आणि सुचित्रा यांनी येथपर्यंत पोचण्यासाठी मोठा संघर्ष केला. आज त्यांच्यामुळे देशाला प्रसिद्धी मिळाली. ही लस बनवणार्‍या तेलुगु आस्थापनाचे महान कार्य जगाला सांगण्यासाठी तेलुगु लोकांनी पुढे आले पाहिजे.

२.‘कोव्हॅक्सिन’ला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली होती. १९ एप्रिल या दिवशी भारत बायोटेकने लसीच्या आपात्कालिन वापराच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे प्रस्ताव सादर केला होता; परंतु नोव्हेंबर मासामध्ये याला मान्यता देण्यात आली.