महंमद पैगंबर यांचा अवमान करणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही ! – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन

केवळ पैगंबरच नव्हे, तर कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही, असे पुतिन यांनी म्हटले पाहिजे ! कारण धर्मांधांकडून हिंदूंसह, शीख, ख्रिस्ती आदी धर्मियांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना यांच्यावर घाला घातला जात आहे. याचाही जगभरातून प्रखर विरोध झाला पाहिजे ! – संपादक

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) – महंमद पैगंबर यांचा अवमान करणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही. यामुळे इस्लामला मानणार्‍या लोकांच्या भावना दुखावल्या जातात.  कलेच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करू नये. लोकांच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान केल्यामुळे कट्टरतावादाला प्रोत्साहन मिळते. पॅरिसमध्ये घडलेली घटना, याचे उदाहरण आहे, असे विधान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केले. फ्रान्मध्ये वर्ष २०१५ मध्ये ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाने महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने त्याच्या पॅरिस येथील कार्यालयावर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. यात १३ जण ठार झाले होते. पुतिन यांच्या या विधानाचे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वागत केले आहे.