ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी केला एक दिवसाचा लाक्षणिक संप !

संप म्हणजे राष्ट्राची हानी, हे लक्षात घेऊन सामोपचाराने समस्या सोडवण्याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील ‘मे. रॉयल कार्बन’च्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका ! – महेश बालदी, आमदार

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील ‘मे. रॉयल कार्बन प्रा. लि. वानिवली’ या आस्थापनेमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असा तारांकित प्रश्न आमदार महेश बालदी यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले.

पुणे येथील मायलेकींच्या मृत्यूनंतर २९ वर्षांनी मिळाला न्याय !

विलंबाने न्याय मिळाल्यास संबंधिताला अन्याय झाल्यासारखे वाटू शकते !

देशाला मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्याला लढायचे आहे ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहासतज्ञ

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यातून संस्कृती, धर्म, राष्ट्र यांना स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी भारतावर राज्य केल्यानंतर भारताला पुन्हा शिवाजी महाराज यांचे स्मरण झाले.

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्वरित कारवाई केली असती, तर गोव्यातील सहस्रो स्वातंत्र्यसैनिकांना यातना भोगाव्या लागल्या नसत्या ! – नरेंद्र सावईकर, माजी खासदार

पंडित नेहरू यांनी गोव्यात सैन्य पाठवले, ते ही सहस्रोंचे बळी गेल्यावर ! हा इतिहास सार्दिन यांना ज्ञात नसला, तरी तो लपून रहात नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे !

तालुक्यातील एखाद्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी मामलेदारांना पाठवू नका !

‘‘लोकांची कामे बाजूला ठेवून मंत्र्यांच्या स्वागतासाठी मामलेदारांना पाठवण्याची काय आवश्यकता ? यापुढे अशा घटना होता कामा नयेत. एखाद्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती असली, तरी त्या ठिकाणी मामलेदारांना पाठवू नका.’’

भाजपचे आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत कणकवली पोलीस ठाण्यात उपस्थित

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत ४५ मिनिटे चौकशी करण्यात आली. ‘या प्रकरणी पोलिसांना आम्ही सर्वतोपरी साहाय्य करू’, असे आमदार राणे यांनी सांगितले.

१ जानेवारी ते ३१ मे २०२२ या कालावधीत यांत्रिक नौकांद्वारे (पर्ससीनद्वारे) मासेमारी करण्यावर बंदी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीनद्वारे मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांचे, मासेमारी बंदीच्या विरोधात १ जानेवारीपासून साखळी उपोषण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.