सिलचर (आसाम) येथे नाताळच्या कार्यक्रमात हिंदु तरुण-तरुणी यांनी सहभागी होण्यास काही लोकांचा विरोध

गौहत्ती (आसाम) – आसाममधील सिलचर येथे २५ डिसेंबरच्या रात्री नाताळ साजरा करत असतांना काही जणांनी त्याला विरोध केला. त्यांनी हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली. या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेविषयी एका भगवाधारी व्यक्तीने ऑनलाईन व्हिडिओमध्ये म्हटले की, आम्ही नाताळच्या विरोधात नाही; मात्र त्यात सहभागी होणारे हिंदु तरुण आणि तरुणी यांच्याविरोधात आहोत. आज ‘तुळशी पूजन दिवस’ होता; मात्र कुणीही तो साजरा केला नाही. या गोष्टीमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. जर प्रत्येक जण नाताळच्या शुभेच्छा देऊ लागला, तर आमचा धर्म कसा वाचणार ? असा प्रश्‍न या व्यक्तीने उपस्थित केला.