|
द्वारका (गुजरात) – हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ असणार्या द्वारका बेटावरील २ द्वीपांवर सुन्नी वक्फ बोर्डाने दावा करत गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. द्वारका बेटावर एकूण ८ लहान द्वीप आहेत.
गुजरात के ‘बेट द्वारका’ के दो द्वीपों पर सुन्नी वक्फ बोर्ड ने किया दावा, हाईकोर्ट ने कहा- कृष्णनगरी में वक्फ का कैसा मालिकाना हक?#Gujarat #Dwarkahttps://t.co/r9X9upKYVq
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 26, 2021
१. वक्फ बोर्डाने याचिकेत म्हटले होते, ‘द्वारका बेटांवरील २ द्वीपांची मालकी आमच्याकडे आहे.’ यावर न्यायालयाने म्हटले, ‘तुम्ही काय सांगत आहात, हे तुम्हाला तरी कळते का ? श्रीकृष्णाची नगरी असलेल्या भूमीवर वक्फ बोर्ड मालकी हक्क कसा काय सांगू शकते ?’, असे विचारत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
२. द्वारका बेट हे पूर्वी भगवान श्रीकृष्णाचे निवासस्थान होते. या बेटावर पोचण्यासाठी ओखा येथून नौकेद्वारे जाण्यासाठी ३० मिनिटांचा कलावधी लागतो. या बेटावर ७ सहस्र कुटुंब रहातात. त्यांतील ६ सहस्र कुटुंबे हे मुसलमान आहेत.