संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परमवीर चक्राने सन्मानित सैन्याधिकार्‍याच्या पत्नीच्या पायांना स्पर्श करून केले वंदन !

नवी देहली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वर्ष १९७१ च्या युद्धात शौर्य दाखवल्यासाठी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेले कर्नल होशियार सिंह यांच्या पत्नी धन्नो देवी यांच्या पायांना स्पर्श करून वंदन केले. राजनाथ सिंह यांनी १४ डिसेंबर या दिवशी नवी देहलीत ‘विजय पर्व संकल्प’ समारंभात त्यांची भेट घेतली.

राजनाथ सिंह या वेळी म्हणाले की, वर्ष १९७१ च्या भारतासमवेतच्या युद्धात पाकिस्तानने त्याचे एक तृतीयांश सैन्य, निम्मे नौदल आणि एक चतुर्थांश वायूदल गमावले आहे. जगाच्या इतिहासातील हा सर्वांत महत्त्वाचा विजय होता. या युद्धात ९३ सहस्र पाकिस्तानी सैनिकांच्या आत्मसमर्पणाला जगाच्या इतिहासात ‘ऐतिहासिक आत्मसमर्पण’ म्हटले आहे.