हरिद्वार (उत्तराखंड) – येथे १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हिंदु धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी यती नरसिंहानंद गिरि यांनी याचे आयोजन केले आहे. या धर्मसंसदेत मोठ्या संख्येने संत, महंत आणि धर्माचार्य उपस्थित रहाणार आहेत. याविषयी महामंडलेश्वर स्वामी यती नरसिंहानंद गिरि यांनी सांगितले, ‘या धर्म संसदेचा मुख्य उद्देश सनातन धर्माला वाचवणे, हा आहे. संपूर्ण जगात अहिंदूंची संख्या वाढत आहे. ‘वर्ष २०२९ मध्ये भारताचा पंतप्रधान अहिंदू असेल’, असे सांगितले जात आहे. ही सर्वाधिक वाईट स्थिती असू शकेल. यापासून कसे वाचता येईल, यावर या धर्म संसदेत चर्चा केली जाईल. आज जगात जितक्याही कट्टरतावादी संघटना आहेत, त्यांचे लक्ष्य भारतच आहे.’