गोमय आणि गोमूत्र यांचे सेवन केल्याने व्यक्तीचे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो !

हरियाणा येथील एम्.बी.बी.एस्. डॉक्टर मनोज मित्तल यांचा गोमय खात असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून दावा !

एम्.बी.बी.एस्. डॉक्टर मनोज मित्तल

कर्नाल (हरियाणा) – येथील एम्.बी.बी.एस्. डॉक्टर मनोज मित्तल यांचा गोमय खात असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून देशभरात प्रसारित होत आहे. त्यात डॉ. मित्तल यांनी ‘गोमय आणि गोमूत्र यांचे सेवन केल्याने व्यक्तीचे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो’, असा दावा केला आहे. डॉ. मित्तल हे बालरोगतज्ञ असून त्यांचे येथे एक मोठे रुग्णालय आहे. डॉ. मित्तल स्वतः अनेक वर्षांपासून गोमय खात आहेत. गोमयामध्ये व्हिटॅमिन ‘बी १२’ असते, तसेच त्यामध्ये माणसाचे किरणोत्सर्गापासून रक्षण होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

१. डॉ. मित्तल म्हणाले की, गोमयामध्ये २८ टक्के ऑक्सिजन असते. त्यामुळे त्याच्या सेवनाने शरिरात थंडावा निर्माण होतो. आपल्या आजुबाजूला असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून बाहेर पडणार्‍या किरणोत्सर्गाचा आपल्या शरिरावर परिणाम होत असतो. यापासून गोमय आपल्या शरिराचे रक्षण करते.

२. मला भाऊ आणि बहीण आहेत. प्रत्येकाचा नैसर्गिक प्रसुतीने जन्म झाला. कुणालाच शस्त्रकर्माची करण्याची वेळ आली नाही; कारण माझी आई गोमय खात होती, असेही डॉ. मित्तल यांनी सांगितले.

३. ‘मी आजपर्यंत कधीच वातानुकूलित यंत्र किंवा पंखा यांचा वापर केला नाही. मी नेहमी फरशीवर झोपतो, अशी माहिती त्यांनी या व्हिडिओमध्ये दिली आहे.