‘रामायण एक्सप्रेस’मधील वाढप्यांसाठी (वेटरसाठी) असलेला साधूंचा वेश पालटणार ! – आय.आर्.सी.टी.सी.

हिंदूंच्या साधूंच्या होणार्‍या अवमानाच्या विरोधात आवाज उठवणारे सनातनचे साधक डॉ. अशोक शिंदे यांचे अभिनंदन ! सर्वच हिंदूंनी यातून बोध घ्यावा !

समान नागरी कायदा आवश्यक असून राज्यघटनेतील कलम ४४ ची कार्यवाही आवश्यक ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने, विविध उच्च न्यायालयांनी अनेकदा सुनावणींच्या वेळी देशात समान नागरी कायदा लागू करण्याविषयी सरकारला सल्ला दिला आहे; मात्र कोणत्याही सरकारने हा कायदा करण्याचा प्रयत्न केला नाही, हे लज्जास्पद !

केंद्र सरकारकडून ३ कृषी कायदे रहित ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

मला कुणालाही दोष द्यायचा नाही. कदाचित् आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आम्ही त्या शेतकर्‍यांची समजूत घालण्यात न्यून पडलो, असे मला वाटते. त्यामुळेच हे ३ कृषी कायदे रहित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राजकारण्यांचे दौरे आणि संतांचे दौरे

‘राजकारणी त्यांच्या मतदारसंघात किंवा इतरत्र जातात, त्या वेळी ‘त्यांचे नाव सर्वत्र व्हावे’, हा त्यांचा उद्देश असतो. या उलट संत अध्यात्माविषयीचे जिज्ञासू आणि साधक यांना साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सर्वत्र जातात.’

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घाला !

हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसी सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घाला, तसेच राज्यात अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा या मागण्यांसाठी निवेदने देण्यात आली.

चीन गोपनीयरित्या त्याच्या अण्वस्त्रांमध्ये करत आहे वाढ ! – अमेरिकेचा अहवाल

चीनच्या अण्वस्त्रांचा धोका अमेरिकेपेक्षा भारताला अधिक असल्याने भारताने सतर्क रहाणे आणि चीनला जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे !

रावणाचे विमान आणि विमानतळ यांच्यावर श्रीलंका करणार संशोधन !

रावणाकडे स्वत:चे विमान आणि विमानतळही होते, याची आम्हाला निश्चिती आहे. त्यावर वस्तूनिष्ठ संशोधन होणे आवश्यक आहे. यासाठी भारतानेही श्रीलंकेला साथ द्यावी, अशी विनंती शशी दाणातुंगे यांनी भारत सरकारला केली आहे.