महाराजगंज (उत्तरप्रदेश) येथील महिला आणि पुरुष पुजारी यांची अज्ञातांकडून हत्या

उत्तरप्रदेशात आतापर्यंत अनेक पुजारी, महंत, साधू यांच्या हत्या झाल्या आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने याकडे गांभीर्याने पाहाण्याची आवश्यकता आहे ! – संपादक

महाराजगंज (उत्तरप्रदेश) – येथे देवीच्या मंदिरातील ६८ वर्षी महिला पुजारी कलावती देवी आणि २३ वर्षी पुजारी रामरतन मिश्र यांची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना महदेईया या गावात घडली. नेपाळ सीमेजळ हे गाव आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याचे अन्वेषण करत आहेत.

(सौजन्य : Dynamite News)

५ मासांपूर्वी पुजारी रामरतन मिश्र यांची शेतभूमी सरकारी प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली होती.  त्या बदल्यात मिश्र यांना १४ लाख रुपये मिळाले होते. या पैशांवरून त्यांची हत्या झाली का ? या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.