चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान मोदी आता स्वीकारणार का ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा प्रश्‍न

डावीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आता स्वीकारणार का ? आणि चीनच्या कह्यात असलेली प्रत्येक इंच भूमी परत मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार प्रयत्न करतील का ?, अशी विचारणा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांनी ३ कृषी कायदे रहित करण्याची घोषणा केल्यानंतर ट्वीट करून केली.

भारत आणि चीन सीमा प्रश्‍नावरून गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. स्वामी केंद्र सरकारवर टीका करत आहेत. ‘नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला, चीन नाही’, असा दावाही त्यांनी यापूर्वी केला होता.