माझ्या मृत्यूनंतर माझ्या पार्थिवाचे हिंदु पद्धतीनुसार दहन करण्यात यावे ! – वसीम रिझवी, माजी अध्यक्ष, शिया वक्फ बोर्ड

‘अंत्यसंस्काराच्या वेळी गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांच्या हस्ते मुखाग्नी देण्यात यावा’, असेही त्यांनी म्हटले आहे.

११ व्या ते १६ व्या शतकांपर्यंत १० कोटी हिंदूंचा नरसंहार झाला ! – इतिहासकार कोनराड एल्स्ट

हा इतिहास हिंदूंपासून का लपवण्यात आला ?, याचे उत्तर आतापर्यंचे सर्वपक्षीय शासनकर्ते देतील का ? हा नरसंहार का आणि कुणी केला ?, हे आता तरी हिंदूंना सांगितले पाहिजे !

शिवचरित्राद्वारे शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास जिवंत ठेवणारे पद्मविभूषण, शतायुषी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश !

आधुनिक काळात अनेक शिवचरित्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरांत पोचवले; परंतु शिवरायांना खर्‍या अर्थाने सामान्यांच्या ह्रदयसिंहासनात कायमचे आसनस्थ करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकमेव, हेच त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव आज त्यांच्या रहात्या घरी, पर्वती येथील पुरंदरे वाड्यात सकाळी ८ वाजता नेण्यात आला. त्यानंतर येथील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दंगल भडकवणार्‍या रझा अकादमीऐवजी स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार्‍या हिंदूंना दोषी ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न ! – आमदार नीतेश राणे, भाजप

रझा अकादमीने काढलेला मोर्चा पूर्वनियोजित होता. हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ? राज्यात सरकारच्या पाठिंब्याने हिंदूंवर अन्याय चालू आहे का ?

ऑनलाईन वस्तूंची विक्री करणार्‍या संकेतस्थळावरून कढीपत्त्याच्या नावाखाली १ टन गांजाची तस्करी !

ऑनलाईन वस्तूंच्या विक्री करणार्‍या एका संकेतस्थळावरून कढीपत्त्याच्या नावाखाली गांजा या अमली पदार्थाची तस्करी होत असल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी भिंडमध्ये कल्लू पवैया (वय ३०) आणि ढाबा मालक ब्रिजेंद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.

कर्ज देणारे आस्थापन ‘नावी’च्या विज्ञापनातून साधूचा अवमान

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना सातत्याने घडत असतात. या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

एस्.टी. महामंडळाने राज्यात ९१८, तर पुणे जिल्ह्यात २६ कर्मचारी निलंबित केले !

राज्यात १२० पेक्षा अधिक एस्.टी. डेपोमध्ये संप चालू असल्याने एस्.टी.ला प्रतिदिन जवळपास कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.

अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीच्या वेळी, म्हणजे १७१ वर्षांपूर्वी एका महिला शास्त्रज्ञाने हवामान पालटाच्या धोक्याविषयी दिली होती चेतावणी !

एकोणिसाव्या शतकात पृथ्वी आणि त्यावरील जीवन यांच्या भविष्याच्या दृष्टीने हवामानातील पालटाच्या धोक्याविषयी मानवाला भरपूर वेळा चेतावणी दिली गेली होती.

(म्हणे) ‘हिंदुत्व’ म्हणणे हे राजकारण !’ – काँग्रसेच्या माजी खासदार आणि अभिनेत्री रम्या

काँग्रेसवाल्यांना हिंदुत्वाची कावीळ झाल्यामुळे त्यांना याहून वेगळे काय वाटणार ? काँग्रेसचे आयुष्य मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदुद्वेष यांतच गेले आहे आणि आता भविष्यात हिंदू काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपल्याविना रहाणार नाहीत !