ऑनलाईन वस्तूंची विक्री करणार्‍या संकेतस्थळावरून कढीपत्त्याच्या नावाखाली १ टन गांजाची तस्करी !

भिंड (मध्यप्रदेश)- ऑनलाईन वस्तूंच्या विक्री करणार्‍या एका संकेतस्थळावरून कढीपत्त्याच्या नावाखाली गांजा या अमली पदार्थाची तस्करी होत असल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी भिंडमध्ये कल्लू पवैया (वय ३०) आणि ढाबा मालक ब्रिजेंद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यांनी आतापर्यंत या १ टन गांजाची तस्करी केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी सांगितले की, कल्लू याने विशाखापट्टणम्मधील एका नामांकित ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापनात बनावट पॅन क्रमांक आणि जीएस्टी क्रमांकासह कढीपत्ता विकण्यासाठी त्याच्या आस्थापनाची नोंदणी केली होती.