वर्धा येथे मौलानाकडून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार !

येथील रामनगर परिसरात समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान (वय २५ वर्षे) या मौलानाने ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अमानुष अत्याचार केले. ही घटना १९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता घडली. पोलिसांनी समीउल्ला याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ. रूपाली चाकणकर यांची निवड !

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राज्यशासनाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. मागील दीड वर्षापासून राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते.

युवकांचे लसीकरण झाले, तर कोरोनाच्या संसर्गाला आळा घालता येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

महाविद्यालयीन युवकांना कोरोनावरील डोस देण्यासाठी राज्यात २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उच्च अन् तंत्र शिक्षण विभाग संयुक्तपणे ‘युवा स्वास्थ कोविड लसीकरण’ ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

नाशिक येथील महापालिकेच्या सभेत फटाकेबंदीचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळला !

‘हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी फटाके उडवावेत’, असे धर्मशास्त्रात सांगितलेले नाही, तसेच मनोरंजन आणि करमणूक यांसाठी फटाके उडवून लाखो रुपयांची उधळपट्टी होते. त्यातूनच राष्ट्रहानी होते, हे लक्षात घ्यायला हवे !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात भाजपचे मुंबईत आंदोलन !

बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर धर्मांधांकडून होत असलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ २० ऑक्टोबर या दिवशी भाजपकडून कफ परेड मैदानावर हातात फलक धरून आंदोलन करण्यात आले.

महापुरुषांच्या चरित्रामुळे लढण्याची प्रेरणा मिळते ! – अनंत करमुसे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

मी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा अनुयायी आहे. त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची चरित्रे सांगून घडवले आहे. त्यामुळे लढण्याची प्रेरणा मिळते. जितेंद्र आव्हाड यांना मी उत्तर दिले; म्हणून त्यांनी माझी पाठ सोलून काढली; पण मी घाबरलो नाही, तर लढण्याचा निश्चय केला.

राज्य परिवहन महामंडळाकडून ४ दिवस आणि ७ दिवसांत ‘आवडेल तिथे प्रवास’ करण्याची सोय !

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक गोष्टी सुरळीत होत असतांना राज्य परिवहन महामंडळही ‘प्रवाशांच्या सेवे’साठी हे ब्रीदवाक्य घेऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देत आहे. ‘एस्.टी.’ने दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांना ४ आणि ७ दिवसांत ‘आवडेल तिथे प्रवास’ करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना १० टक्के रक्कम परत करण्यास प्रारंभ

अवसायनात (बुडित) गेलेल्या ‘भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गारगोटी, कोल्हापूर’ या पतसंस्थेने आपल्या ठेवीदारांच्या एकूण मुद्दलाच्या १० टक्के रकमेची परतफेड करण्यास प्रारंभ केला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत या ठेवी देण्यात येणार आहेत.

सरकारने पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन !

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ मित्र मंडळ चौक येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.