नाशिक येथील महापालिकेच्या सभेत फटाकेबंदीचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळला !

‘हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी फटाके उडवावेत’, असे धर्मशास्त्रात सांगितलेले नाही, तसेच मनोरंजन आणि करमणूक यांसाठी फटाके उडवून लाखो रुपयांची उधळपट्टी होते. त्यातूनच राष्ट्रहानी होते, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक

सौजन्य : साम TV

नाशिक – दिवाळीच्या वेळी नाशिकसह उत्तर महाराष्ट्र येथे फटाके विक्रीवर बंदी घालण्याच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी पत्रक काढले होते. हे पत्रक उत्तर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांना देण्यात आले. सध्या कोरोनाचे संसर्गाचे प्रमाण अल्प होत असतांना फटाकेबंदीचा प्रस्ताव करणे चुकीचे आहे, असे सांगत येथील महापालिकेतील सर्वसाधारण सभेत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सादर केलेला प्रस्ताव सर्वानुमते फेटाळण्यात आला, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे. (राज्य आर्थिक संकटात असतांना फटाक्यांची विक्री करणे आणि ते उडवणे सर्वथा अयोग्य ! – संपादक)