सरकारने पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन !

मित्र मंडळ चौक येथे पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करतांना आमदार सुधीर गाडगीळ आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते

सांगली – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांना अल्प साहाय्य केल्याच्या निषेधार्थ मित्र मंडळ चौक येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी १५० हून अधिक व्यापार्‍यांनी त्यांना मिळालेले साहाय्याचे धनादेश मुख्यमंत्र्यांना परत करत असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन राजे शिंदे यांनी ‘पूरग्रस्तांना जोपर्यंत साहाय्य मिळत नाही तोपर्यंत भाजप या प्रश्नाचा पाठपुरावा करेल आणि भविष्यात तीव्र आंदोलन करेल’, असे घोषित केले. या प्रसंगी भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजप प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, हणमंतराव पवार, श्रीकांत शिंदे, दीपक माने, अविनाश मोहिते यांसह पूरग्रस्त व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.