सत्यान्वेषी पत्रकारिता !
समाजाला गुन्हेगारी, अमली पदार्थांच्या कह्यात गेलेल्यांचे उदात्तीकरण करणार्या नाही, तर या सर्वांचे लागेबांधे उघड करणार्या सत्यान्वेषी पत्रकारितेची आवश्यकता आहे !
समाजाला गुन्हेगारी, अमली पदार्थांच्या कह्यात गेलेल्यांचे उदात्तीकरण करणार्या नाही, तर या सर्वांचे लागेबांधे उघड करणार्या सत्यान्वेषी पत्रकारितेची आवश्यकता आहे !
या जागतिक षड्यंत्राविषयी मला कोणतीही माहिती नव्हती; मात्र यापुढे मी माझ्या कार्यक्रमांतून याविषयी जागृती करेन, असे आश्वासन ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’चे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.
६ मासांपूर्वी जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ च्या इमारतीवर वडाचे झाड पडून इमारत धोकादायक बनली होती; मात्र येथील ग्रामीण रुग्णालय प्रशासन आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासन या शासनाच्या २ विभागांत समन्वय नसल्याने हे झाड अद्याप त्याच स्थितीत आहे.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासकीय अधिकार्यांची अनास्था दिसून येणे हे लज्जास्पद !
कोरोना महामारीच्या काळात गोवा राज्यातील खासगी प्रवासी बसगाड्यांना महाराष्ट्रात प्रवेश नव्हता; मात्र आता कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने २१ ऑक्टोबरपासून दोडामार्गमार्गे महाराष्ट्रात गोव्यातील खासगी बसगाड्यांना वाहतूक करण्यास अनुमती देण्यात आली आहे. ही सेवा चालू व्हावी, यासाठी शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रशासनाला चेतावणी दिली होती.
शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांना आळा घालण्याच्या सूचना वेळोवेळी पोलीस ठाणे प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या हद्दीत कोणताही अवैध धंदा चालू नाही, असे प्रतिज्ञापत्रही लिहून घेण्यात आले आहे.
२४ ऑक्टोबर या दिवशी होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रहित करावा, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना २० ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.
गुन्हे अन्वेषण विभागाने नायजेरियाचा नागरिक आमेची डोनाटस् याला समवेत ७ लक्ष ४० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले आहे. डोनाटस हा उत्तर गोव्यात पार्ट्यांसाठी अमली पदार्थांचा पुरवठा करत असे. त्याच्याकडून ‘एल्.एस्.डी.’ ब्लाट्स, एक्स्टसी टॅबलेट आदी अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले आहेत.
शहरातील शिंगणापूर बंधार्याला मोठी गळती लागली आहे. ही गळती २४ आणि २५ ऑक्टोबर या दिवशी काढण्यात येणार असल्याने हे दोन दिवस कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. या दिवसांत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बांगलादेशात कुराणाचा अवमान झाल्याचा आरोप करत धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याच्या प्रकरणात अनेक हिंदू ठार झाले. इक्बाल हुसेन याने श्री दुर्गादेवी पूजा मंडपातील श्री हनुमानाच्या मूर्तीच्या पायाजवळ कुराण ठेवल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.