राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ. रूपाली चाकणकर यांची निवड !

सौ. रूपाली चाकणकर

मुंबई – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राज्यशासनाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. मागील दीड वर्षापासून राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते.