हिंदू एका ध्येयाने संघटित झाले, तर भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होऊ शकतो ! – विवेक सिन्नरकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य, विश्व हिंदु परिषद

४५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कुणाला विचारायला गेले नव्हते. त्यांनी मूठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. नंतर त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करतांना गोमाता आणि प्रजेचे रक्षण करणे; मंदिरांच्या मशिदी झाल्या होत्या, त्यांचे पुन्हा मंदिरांमध्ये परावर्तित करणे असे कार्य केले. आजही आपण या एका ध्येयाने संघटित झालो, तर या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करू शकतो. हे करण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही.