वाशी (नवी मुंबई) येथे दुर्गामाता दौडीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचा उत्साहात सहभाग !

नवी मुंबई – विजयादशमीच्या दिवशी येथील छत्रपती शिवाजी चौक येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने दुर्गामाता दौड काढण्यात आली. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धारकरी मिळून ५०० जण या दौडीमध्ये सहभागी झाले होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नवी मुंबईचे समन्वयक श्री. भरत माळी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविषयीच्या सर्व नियमांचे पालन करत ही दौड पार पडली.

दौडीमध्ये सहभागी धारकरी

‘समर्थ एक्सिम सर्विसेस’चे श्री. नीलेश फणसे यांनी भगव्या ध्वजाला श्रीफळ वाढवले. त्यानंतर धारकरी श्री. प्रवीण सावंत यांनी सपत्नीक ध्वजाची आरती केली. यानंतर दुर्गामाता दौड चालू झाली. श्री. भरत माळी यांनी उपस्थित धारकर्‍यांना संबोधित करतांना ‘पन्हाळा ते विशाळगड गडकोट मोहिमे’ची माहिती दिली. दौडीमध्ये माजी सैनिक श्री. उदय भोसले सहभागी झाले होते. यांसह ऐरोली येथून सर्वश्री रोहित साळुंके, ज्ञानेश्वर शिंदे, चिंचपाडा विभागातून सर्वश्री मंगेश नलावडे, सुनील तुपे, घणसोली विभागातून श्री. अमोल कदम, कोपरखैरणे येथून सर्वश्री अमोल जानकर, विनीत पाटील, ईश्वरनगर येथून श्री. विक्रम पवार, दिघा येथून श्री. कुमार गावकर, विशाल बागल, तुर्भे विभागातून सर्वश्री प्रवीण सावंत, गणेश उंबरकर, नेरूळ विभागातून धना शेवाळे, स्वप्नील झणझणे, निखिल शिंदे, वाशी येथून सर्वश्री प्रमोद पाटील, अजिंक्य खोत, मानखुर्द विभागातून सुरज जाधव, पनवेलमधून सर्वश्री अविनाश चौधरी, मिथुन म्हात्रे, विक्रम पाटील सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संस्कारांनी महाराष्ट्र घडला पाहिजे ! – भरत माळी, नवी मुंबई समन्वयक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

गडकोट मोहिमेच्या माध्यमातून पूजनीय संभाजी भिडेगुरुजी युवकांमध्ये क्षात्रतेजाचे संस्कार घडवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संस्कारांनी महाराष्ट्र घडला पाहिजे. यासाठी युवकांनी गडकोट मोहिमेत सहभागी व्हावे.

रायगड जिल्ह्यात पेण आणि रोहा येथे दुर्गामाता दौड !

पेण शहरामध्ये श्री. शेखर बामणे आणि अन्य धारकरी यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून दुर्गामाता दौड काढली, तर रोहा तालुक्यातील आमडोशी येथे श्री. सौरभ जांभेकर आणि अन्य धारकरी यांनी दुर्गामाता दौड काढली.