जीवनात घडणार्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि आत्महत्या करणे अयोग्य आहे, हे समजण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !

पुणे, २ ऑगस्ट – नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या श्रीया पुरंदरे या १७ वर्षीय तरुणीने १ ऑगस्ट या दिवशी सकाळी नांदेड सिटी येथील मधुवंती इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. खाली पडल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयामध्ये नेण्यात आले; पण त्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून हवेली पोलिसांकडून आत्महत्येचा तपास चालू आहे.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. ती सध्या बारावीत शिकत होती. श्रीयाच्या वडिलांची हॉर्स रायडिंगची अॅकॅडमी आहे.
परभणीत मंदिराचे छत कोसळले; ७ भाविकांचा मृत्यू !
१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला