भाजपचे खासदार रामचंद्र जांगडा यांचा दावा
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – सर्व शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज आहेत. केवळ हिंदूच नाही, तर उत्तरप्रदेश मुसलमान शिल्पकारांनीही भरलेला आहे. बाबर त्याच्यासमवेत शिल्पकार घेऊन आला नव्हता. मध्यपूर्वेत शिल्पकार असूच शकत नाहीत. इराक आणि इराण या देशांमध्ये गवतसुद्धा उगवत नाही, तिथे शिल्पकला कशी निर्माण होऊ शकते ? खनिज तिथे मिळत नाही. तिथे केवळ तेल मिळते आणि तेलामुळे शिल्पकला करता येत नाही, असे विधान भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि मागास आयोगाचे सदस्य रामचंद्र जांगडा यांनी केले आहे. ते येथील रामपुरीमधील गौरव समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.
‘All Muslim sculptors descendants of Vishwakarma’: BJP MP in poll-bound UP https://t.co/nF4nGyKlCu
— Hindustan Times (@HindustanTimes) August 2, 2021
जांगडा पुढे म्हणाले की, येथे जे मुसलमान बांधव आहेत, ते सर्वच्या सर्व भगवान विश्वकर्माचे वंशज आहेत. कुठल्यातरी कारणामुळे त्यांना धर्मांतर करावे लागले असेल. मी इतिहास वाचला आहे. ही कारणेही मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत. अनेक गोष्टी केवळ सांगण्यासाठी असतात; मात्र एक गोष्ट निश्चित आहे की, जेथे श्रमाला प्रतिष्ठा आणि सन्मान मिळत नाही, पुरुषार्थाला सन्मान मिळत नाही, तेथे व्यक्ती धर्मालाच दोष देते. हे केवळ मुसलमान शिल्पकारांनीच केले आहे, असे नाही, तर हे बाबासाहेब आंबेडकर यांनीही केले. ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’, हे त्यांना बोलावे लागले. ते बॅरिस्टर आणि अर्थतज्ञ होते. जो सन्मान त्यांना समाजाकडून मिळायला हवा होता, तो त्यांना मिळाला नाही. हेच मुसलमान शिल्पकारांसमवेत झाले असेल. सन्मान मिळाला नाही म्हणून त्यांनी धर्मांतर ही प्रतिक्रिया दिली. (आता त्यांना सन्मान मिळत आहे, तर ते घरवापसी का करत नाहीत ? सरकारनेही घरवापसी करणार्यांना सुविधा आणि संरक्षण पुरवावे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)