‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यावर कथित भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद !

जयपूर (राजस्थान) येथे भगव्या ध्वजाचा अवमान केल्याच्या विरोधात वृत्त प्रसारित केल्याचे प्रकरण

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हा पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचाच प्रयत्न आहे. देशातील प्रसारमाध्यमे याचा संघटितपणे विरोध का करत नाहीत ?

जयपूर (राजस्थान) – राज्यातील आमागड येथे काही दिवसांपूर्वी मीणा समाजाच्या लोकांनी भगवा ध्वज फाडल्याच्या प्रकरणी ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी त्यांच्या वाहिनीवरून भडकाऊ टिपण्या केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात जयपूरच्या ट्रान्सपोर्ट नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याविषयी चव्हाणके यांनी ट्वीट करून म्हटले की, राजस्थान पोलिसांनी माझ्यावर अनुसूचित जाती आणि जमाती कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे, जो मी केलाच नाही. राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या आदेशावरून पोलीस काम करत आहेत. भगवा ध्वज फाडण्याच्या वेळी उपस्थित असलेले काँग्रेसपुरस्कृत आमदार राकेश मीणा यांच्यावर कारवाई करण्याऐवजी माझ्यावर कारवाई केली जात आहे.