पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील सनातनच्या साधिका सौ. शकुंतला दिगंबर खरात यांची आई कलावती सिताराम पारेकर (वय ८० वर्षे) यांचे खर्डी (तालुका पंढरपूर) येथे १ ऑगस्ट या दिवशी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात १ मुलगा, २ सुना, २ मुली, २ जावई, नातवंडे, पतवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार पारेकर आणि खरात कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.