अमरावती येथील सनातनचे साधक श्री. श्रीकांत मुळावकर यांचे वडील शरद नारायणराव मुळावकर (वय ८४ वर्षे) यांचे ३१ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री. श्रीकांत मुळावकर काका गेल्या १४ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. सनातन परिवार मुळावकर यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.