पाकच्या गृहमंत्र्यांची स्वीकृती !
पाक तालिबानला साहाय्य करत आहे, हे यातून उघड होते !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या मदरशांतील अनेक जिहादी तरुण अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यासाठी गेले असून त्यांतील अनेक जण युद्धामध्ये ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह पाकमध्ये पाठवण्यात येत आहेत. मदरशांचे संचालक असणारे मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते ) या युद्धाला ‘जिहाद’ म्हणत आहेत. ते संपूर्ण पाकमध्ये याच्यासाठी समर्थन मिळवत आहेत, तसेच तालिबानसाठी पैसेही गोळा करत आहेत.
पाकच्या अफगाणिस्तानच्या सीमेवरील खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान प्रांतातील स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाकिस्तानी तरुण तालिबानसमवेत अफगाणी सैन्याशी लढतांना मोठ्या संख्येने ठार झाले आहेत. या ठार झालेल्या जिहादी तरुणांचे दफन करतांना लोक मोठ्या संख्येने उपस्थित रहात आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी मान्य केले की, काही आतंकवाद्यांचे मृतदेह पाकमध्ये आणले जात आहेत.
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran