भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने ईदनिमित्त अनुमती दिलेल्या तात्पुरत्या पशूवधगृहांना उच्च न्यायालयाकडून स्थगिती !

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने ईदनिमित्त २१ ते २३ जुलै या कालावधीत तात्पुरत्या ३८ पशूवधगृहांना अनुमती दिली होती. महानगरपालिकेच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गौ ज्ञान फाऊंडेशनच्या प्रयत्नांना यश !

पांढरकवडा (यवतमाळ) येथे मुलीला जन्म दिल्याने नणंदेने वहिनीला जिवंत जाळले !

नात्यांमधील संवेदनशीलता संपत चालल्याचेच हे लक्षण !

ईदनिमित्त नियमित १ सहस्र जनावरे कापण्याची अनुमती मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली !

देवनार येथील पशूवधगृहामध्ये ईदनिमित्ताने २१ ते २३ जुलै या कालावधीत नियमित ३०० मोठी जनावरे कापण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनुमती दिली आहे

देशहित मोठे कि राजकीय स्वार्थ ?

सरकारने जसा हेरगिरीवर चाप लावला पाहिजे, तसाच राजकीय स्वार्थासाठी संसदेचे कामकाज रोखून धरणार्‍यांवरही चाप लावला पाहिजे. हेही सरकारचे कर्तव्यच आहे.

हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दोन पत्रकार कह्यात !

‘क्राईम चेक टाईम’ या वेबपोर्टलचे पत्रकार असल्याचे सांगून २ पत्रकारांनी हॉटेल मालकाला तुम्ही अवैधरीत्या मद्य विक्री करत आहात. तेव्हा हे प्रकरण मिटवण्यासाठी १ सहस्र रुपये देण्याची मागणी केली…..

आषाढीच्या निमित्ताने टाळ मृदंग-हरि नामाच्या गजरात ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ नंदवाळकडे रवाना !

प्रतिवर्षी आषाढीच्या निमित्ताने भक्त मंडळ आणि ‘जय शिवराय फूटबॉल प्लेअर तरुण मंडळ’ यांच्या वतीने असणार्‍या ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ने मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता नंदवाळकडे प्रस्थान केले.

‘डान्सबार’ कुणामुळे चालू ?

डान्सबार बंद व्हावेत, यासाठी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. वरील वृत्ताच्या निमित्ताने विषयाला आरंभ झालेलाच आहे, तर प्रशासनाने आता कठोर भूमिका घेऊन डान्सबार कायमस्वरूपी कसे बंद होतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा !

हिंदूंच्या मंदिरांचा वापर पूजापाठ आदींविषयी होण्याऐवजी तेथे ‘शॉपिंग सेंटर’ निर्माण झाले आहेत, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली. या वेळी न्यायालयाने प्रशासनाच्या धार्मिक व्यवस्थापन विभागावर कोरडे ओढले.

खासगी आस्थापनात कधी असे घडेल का ? सरकारमध्ये भ्रष्टाचार्‍यांचा धुमाकूळ आहे, हे यातून सिद्ध होते !

‘काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गोळा करण्यात आलेल्या ‘ओबीसीं’च्या ‘इंपेरिकल डेटा’मध्ये एकूण ६९ लाख चुका होत्या, असा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.’