विश्व हिंदु परिषदेचे अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांच्या हस्ते अश्व पूजन

कोल्हापूर, २० जुलै (वार्ता.) – प्रतिवर्षी आषाढीच्या निमित्ताने भक्त मंडळ आणि ‘जय शिवराय फूटबॉल प्लेअर तरुण मंडळ’ यांच्या वतीने असणार्या ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ने मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता नंदवाळकडे प्रस्थान केले. युवानेते ऋतुराज क्षीरसागर आणि ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांच्या हस्ते आरती झाली. विश्व हिंदु परिषदेचे अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांच्या हस्ते अश्व पूजन झाले. कोरोनाच्या संसर्गामुळे ही दिंडी फुलांनी सजवलेल्या ‘के.एम्.टी.’बसमधून रवाना झाली.
वाटेत बिनखांबी गणेश मंदिर, खंडोबा देवालय, तसेच विविध ठिकाणी भाविकांनी पालखी घेऊन जाणार्या ‘के.एम्.टी.’वर फुले उधळली. ‘सायबा’ समूहाच्या वतीने वारकर्यांना चहा आणि फराळ देण्यात आला. सोहळ्यासाठी संस्थापक दीपक गौड, संतोष कुलकर्णी, पत्रकार राजेंद्र मकोटे, संभाजी पाटील, गंगाधर दास, ह.भ.प. एम्.पी. पाटील, दिंडीप्रमुख ह.भ.प. आनंदराव लाड महाराज आणि ह.भ.प. बाळासाहेब पवार यांनी परिश्रम घेतले.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच